जामखेड न्युज – – – –
जामखेड महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त स. 10.30 वा. अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा. डॉ.सुनिल नरके हे होते. कार्यक्रमासाठी हिंदी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. देशपांडे मॅडम, इंग्रजी विभागाचे सहा. प्रा. गौरव म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ.नरके यांच्या हस्ते प्रतिमापूजन होवून कार्यक्रमास सुरवात झाली.
छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे होते. त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला नितांत गरज आहे. विद्यार्थ्यानी शाहू चरित्राचा अभ्यास करावा, असे मत डॉ. नरके सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. श्री. पेटकर योगेश यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. गायकवाड आश्र्विनी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इतिहास विभागाने केले होते.