ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार

0
190

 

जामखेड प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांचे उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन जळगाव येथील नियोजन भवनात पार पाडले. यावेळी मंत्री गुलाब पाटील व माजी आमदार गुलाब देवकर यांचे हस्ते जामखेड येथील कवी लेखक कथाकार जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार दै केसरी तालूका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे. राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे माजी मंत्री गुलाबराव देवकर. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत. जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे. पत्रकार संघाचे सचिव ओंकार दळवी प्रेसफोटोग्राफर चिन्मय राजगुरू. शरद डुचे आदी उपस्थित होते.दरम्यान खंडागळे यांना जीवनगौरव पुरस्काराबद्दल आमदार रोहित पवार. माजी मंत्री प्रा राम शिंदे.यांच्यासह विविध क्षेत्रातून अभिनंदना वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here