जामखेड पोलिस स्टेशन आयोजित रक्तदान शिबीराचा महायज्ञ सोहळा झाला – पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

0
248
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – – 
दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले होते. या काळात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे चालू वर्षी शहरासह तालुक्यातील दहा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यास तरूणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास एक हजार रक्ताच्या बॅग जमा झाल्या आहेत त्यामुळे रक्तदान शिबीर म्हणजे महायज्ञ सोहळा झाला आहे असे मत प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सांगितले.
   माझे जामखेड, माझी जबाबदारी या सदराखाली दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त एकाच वेळेस जामखेड तालुक्यात १० ठिकाणी. भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते  रविवार दि .०१ मे २०२२ रोजी  सकाळी ९ .३० ते ०५.०० वा . पर्यंत तालुक्यातील १ ) महावीर मंगल कार्यालय २ ) जामखेड महाविद्यालय . ३ ) खर्डा दुरक्षेत्र ४ ) नान्नज दुरक्षेत्र ५ ) फक्राबाद ६ ) जवळा ७ ) साकत ८ ) राजुरी ९ ) अरणगाव १० ) देवदैठण , ता . जामखेड जि . अ . नगर याठिकाणी रक्तदात्यांना आपले रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
    यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, रक्तदान शिबीराला तरूणांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास एक हजार तरूणांनी रक्तदान करत पोलीस स्टेशनवर असणारा विश्वास सार्थ ठरविला आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असताना जामखेड तालुक्यातील जनतेने जात, पंथ, धर्म बाजूला ठेवून आम्ही भारतीय आहोत या सदराखाली रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
     यावेळी सकाळी सुरू झालेल्या रक्तदान शिबीरास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी प्रत्येक ठिकाणी भेट दिली यावेळी विविध राजकीय मान्यवरांसह पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, जामखेड महाविद्यालयाने प्राचार्य विकी घायतडक, प्रा. लक्ष्मण ढेपे, अविनाश ढेरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण सह सर्व सदस्य हजर होते.
   यावेळी बोलताना प्रा. लक्ष्मण ढेपे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होणे म्हणजे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक हजार रक्ताच्या बॅग जमा झाल्या आहेत.
  साकत येथे रक्तदान शिबिरास भेट देण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आले असता मोठ्या उत्साहात रक्तदान शिबीर सुरू होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट सर, सरपंच हनुमंत पाटील, माजी चेअरमन प्रा. अरुण वराट सर, चेअरमन कैलास वराट सर,
माजी सरपंच हरिभाऊ मुरुमकर, कांतीलाल वराट, महादेव वराट सर, अजित वराट, ज्येष्ठ शिक्षक उदयकुमार दाहितोडे
पोलीस कर्मचारी संजय लाटे, सचिन पिरगळ, पोलीस पाटील महादेव वराट सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. साकतमध्ये दुपारी बारा पर्यंत ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here