जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
जामखेड येथिल तहसील कार्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला, यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच माजी सैनिकची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.
सकाळी आठ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहण समारंभसाठी तहसीलदार योगेश चंद्रे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड गटविकास विकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, आम आदमी पक्षाचे जिल्हा कार्यवाह संतोष नवलाखा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, जेष्ठ नेते सुरेश भोसले, हरिभाऊ बेलेकर, प्रकाश सदाफुले, दिगांबर चव्हाण, भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक श्री. जगताप, श्री. तापकीरे आदी मान्यवरांंसह
जामखेड तालुका माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष कांतीलाल कवादे, उपाध्यक्ष नारायण नागरगोजे सचिव शहाजी ढेपे, सहसचिव पोपट सांगळे, संचालक अशोक चव्हाण, शिवनेरी अकॅडमीचे प्रमुख कॅप्टन लक्ष्मण भोरे, तानाजी गर्जे, राजकुमार भराटे, रावसाहेब कापसे, नवनाथ आंधळे, रमेश मोरे, वसंत माळवेसह विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.





