शिवसेना संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांच्या हस्ते आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सोबत विश्वकर्मा मंदिर कलशारोहन समारंभ

0
206
जामखेड न्युज – – – – – 
   दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले होते. या काळात आरोग्य कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा केली. त्या कर्मचाऱ्यांचा कुठेतरी सन्मान होणे गरजेचे आहे म्हणून कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांनी नगर जिल्हा रुग्णालयात जाऊन कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
     तसेच भगवान विश्वकर्मा मंदिर कलशारोहन सोहळा पिंपळनेर ता.पारनेर या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सोबत मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमात उपस्थित राहून आण्णा हजारे यांचे मार्गदर्शन घेतले.
   आरोग्य अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, वार्डबाॅःय यांनी कोवीड काळात आपला जीव धोक्यात घालून काम केल्याबद्दल नगर येथील जिल्हा रुग्णालयात जाऊन शिवसेना कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांनी आरोग्य कर्मचार्‍यांचा सत्कार केला
      शिवसेना कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवल्या त्यामुळे पदाधिकार्‍यांची मरगळ जाऊन नविन उभारी आली आहे. विधानसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांच्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here