जामखेड न्युज – – – – –
आज राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) महत्वापूर्ण बैठक पार पडली आहे. आ बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्याच्या बैठकीतही निर्णयांचा धडका कायम राहिली आहे. यात सर्वात मोठा निर्मण म्हणजे 18 तालुक्यातील कायम विना अनुदानित शाळांसाठी (Schools) घेण्यात आलाय. या 18 तालुक्यातील विना अनुदानित महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.
तसेच कोरोनाबाबातही (Corona Update) महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तुर्तास तरी मास्क सक्तीबाबत निर्णय नको अशाही प्रकारची चर्चा झाली आहे. तेसच शेतकऱ्यांसाठीही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आज घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये वन विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, गृह विभाग, सहकार विभाग, उच्च व तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय व विशेष सहा्य, सार्वजनिक आरोग्य, आदी विभागांचा समावेश आहे.
वन विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, गृह विभाग, सहकार विभाग, उच्च व तंत्रशिक्षण, सामाजिक न्याय व विशेष सहा्य, सार्वजनिक आरोग्य इत्यादी विभागांना आजच्या निर्णयांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यात विभागांचे महत्वाचे प्रश्न आता तातडीने सुटणार आहेत.