जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे सुपुत्र CRPF जवान गणेश कृष्णाजी भोसले वय ३९ हे सेवेत असताना. दि २७ एप्रिल रोजी मध्यरात्री गडचिरोली येथे त्यांना वीर मरण आले. त्यांनी देश सेवेसाठी १७ वर्ष जम्मू-काश्मीर, छत्तीसगड , गुजरात उत्तराखंड व गडचिरोली अशा विविध भागात सेवा केली आहे. त्यांचेवर जामखेड येथे दि २८ रोजी त्यांचे राहते घरापासून शहरातील विविध भागातून सजवलेल्या गाडीत अंतयाञा काढण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांनी फुले आर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्या नंतर शासकीय इतमामात सलामी देत नातेवाईकांनी अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व लहान दोन मुले असा परिवार आहे.
शहीद गणेश कृष्णाजी भोसले हे गेल्या १७ वर्षांपासून कमांडीग अॉफीसर म्हणून जम्मू-काश्मीर, छत्तीसगड व गडचिरोली अशा विविध भागात सेवा केली आहे. सध्या ते सहा वर्षापासून गडचिरोली या ठिकाणी डी आय जी अॉफीस मध्ये सेवा बजावत होते. दि २७ रोजी मध्यरात्री च्या सुमारास सेवा बजावत आसताना शहीद झाले. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. शहीद गणेश भोसले यांचे पार्थिव आज दि २८ रोजी जामखेड येथे आणण्यात आले . या नंतर त्यांच्या राहात्या घरापासून त्यांची फुलांनी सजवलेल्या रथामधुन शहरातील शिवाजी नगर- पोलीस स्टेशन रोड – खर्डा चौक- तपनेश्वर रोड मार्गे आमरधाम या ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी ठिक ठिकाणी फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली या अंतयाञे मध्ये नागेश विद्यालय व ल ना होशिंग विद्यालयाचा एनसीसी युनिटच्या संचलन केले. तसेच येथील शिवनेरी अँकडमी चे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. यावेळी वीर शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता सर्वत्र देशभक्तीपर गीत गायले जात होते कडकडीत उन्हात ही अंतयाञा निघाली होती. यावेळी येथील कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने शरबत दिले जात होते यामध्ये असंख्य नागरिक महिला सहभागी झाल्या होत्या. अंतयाञे दरम्यान
शहरातील व्यावसायिकांनी काही काळ आपली दुकाने बंद ठेवली होती.
तपनेश्वर आमरधाम येथे केंद्रीय राखीव पोलीस दल गडचिरोली चे हवालदार माने व आकरा जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल तळेगाव दाभाडे चे पोलीस निरीक्षक साळुंखे व आठरा जवान व जिल्हा पोलीस अहमदनगर व जामखेड पोलिस यांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडल्या व मानवंदना देण्यात आली यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने राजेश मोरे, नगरपरिषद चे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, माजी सैनिकांच्या वतीने बजरंग डोळे, कांतीलाल कवादे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, मनसे ता.अध्यक्ष प्रदिप टापरे, विवेक कुलकर्णी, पञकार संघटनेचे अध्यक्ष नासिर पठाण, शिवनेरी अँकडमी च्या वतीने कँप्टन लक्ष्मण भोरे, वारकरी संप्रदायाच्या वतीने ह भ प दिपक गायकवाड व पंढरीनाथ राजगुरू आर एस एस संघटनेच्या वतीने ज्ञानेश्वर अंदुरे जैन समाजाच्या वतीने कांतीलाल कोठारी, दिलीप बाफना आकाश बाफना, अनिल बाफना, संचालक राजेश मोरे,, प्रा. लक्ष्मण ढेपे, पवन राळेभात, कुंडल राळेभात, आदी नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्या नंतर भोसले कुटुंबियांच्या वतीने बंधु मयुर भोसले व कुटुंबीयांनी अग्नी दिला आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयातील शिक्षक मयुर भोसले यांचे ते सख्खे बंधु होते.