जामखेड न्युज – – – –
वाशी / कळंब (जि.उस्मानाबाद ) : वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गिरवली फाट्याजवळ मोटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली. कळंबचे (Kalamb) सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या चमूने छापा टाकला. पोलिसांनी १६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून मोबाईल, चारचाकी वाहने, रोकड, जुगार साहित्य असा एकूण ६३ लाख ७६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही बुधवार (ता.२७) साडेदहाच्या सुमारास करण्यात आली. रमेश यांनी सांगितले की, वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गिरवली फाट्याजवळ मोटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये खुलेआम तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Police Raid On Gambling Spot, Cases File Against 16 People In Kalamb Of Osmanabad)
पोलिस अधीक्षक नीवा जैन यांच्या आदेशानुसार जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास छापा टाकला. त्यानुसार जहुर कमरोद्दीन काझी, प्रशांत अंगद मते, शेख अन्वर शेख महमद, पांडुरंग अंकुश मोटे, भारत नारायण ढगे, प्रकाश देवू चव्हाण, मारुती भाऊराव ढोणे, रस्तुम आशाराम लांडे, अरुण बाबुराव लाटकर, राहुल सूर्यकांत पोपले, वसंत महादेव भडाणे, शेख चाँद शेख हमीद, मनीष शांतीलाल वंच्छय, सागर सुनील राऊत, भानुदास एकनाथ उगले, राहुल शंकर खंडागळे (सर्व रा.बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरवली फाट्याजवळ मोटे यांनी जागा उपलब्ध करून दिली तर उमेश भगवान मुंढे यांचा तो जुगार अड्डा होता. त्या दोघांचा शोध सुरू असून १६ जणांविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाही सहायक पोलीस अधीक्षक एम रमेश, पोलिस उपनिरीक्षक ए टी मालुसरे, पोलिस कर्मचारी शेख, तांबडे, मंदे, शेख, राऊत, शिंदे, खांडेकर, पाटील यांच्या पथकाने केली.