जामखेड न्युज – – – –
राज्य सरकारच्या महसूल विभागातील राजस्व अभियानात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पुरस्कार मिळाले. आता ग्राम विकास विभागाच्या महाआवास अभियानातही अहमदनगर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या अभियानातील राज्य पुरस्कृत योजनेमध्ये अहमदनगरला प्रथम पुरस्कार मिळाल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या अभियानातील स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण विभागात गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा द्वितीय आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महआवास अभियान २०२०-२०२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.





