जामखेड न्युज – – – –
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय चे प्राचार्य मडके बी के यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ वर्कर पदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी स्कुल कमिटी , शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर , रा. कॉ. महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेंद्रजी कोठारी, शाळा व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोरे , उपप्राचार्य प्रकाश तांबे, पर्यवेक्षक साळवे डी एन , उमर भाई कुरेशी, प्रा राहुल आहेरे, प्रा रमेश बोलभट,प्रा विनोद सासवडकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, एन सी सी प्रमुख मयुर भोसले,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कोठारी यांनी विद्यालयाचे विविध उपक्रम व गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांचे कौतुक केले. व नागेश विद्यालयाची वाटचाल गुणवत्ते कडे चालली आहे व या ठिकाणी कार्य करणारे तीन प्राचार्यांची लाईफ वर्कर पदी निवड झाली आहे ही अभिमानाची बाब आहे.
असे मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य मडके बी के यांनी म्हटले की लाईफ वर्कर पदामुळे रयत शिक्षण संस्थेचे साठी कार्य करण्यास संधी मिळाली व विद्यालय गुणवत्ता पूर्ण व उपक्रम शील करणार असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर यांनी श्री नागेश विद्यालय ची प्रगती याबद्दल प्रा मडके बी के यांचे अभिनंदन करून लाइफ वर्कर पद मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
स्कूल कमिटी, सल्लागार समिती , शाळा व्यवस्थापन विकास समिती , पालक शिक्षक संघ, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,रयत सेवक, विद्यार्थी, शाळा हितचिंतक यांनी अभिनंदन केले. तसेच
कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा श्री रोहित( दादा )पवार यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रमेश बोलभट आभार प्रदर्शन प्रा संतोष सासवडकर यांनी केले.