भिंतीत लपवलेली ९ कोटींहून अधिक रोकड व १९ किलोच्या चांदीच्या विटा मुंबईतून जप्त!!!

0
233
जामखेड न्युज – – – – 
महाराष्ट्र जीएसटी विभागाने मोठी कारवाई करत १९ किलोच्या चांदीच्या विटा आणि ९ कोटी ७८ लाख रुपये रोकड जप्त केली आहे. मुंबईत ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच हा परिसरही आता सील करण्यात आलेला आहे. भिंत आणि फरशीखालच्या रिकाम्या जागेत हा ऐवज आढळून आला आहे.
मुंबईतल्या जवेरी बाजार परिसरातल्या चामुंडा बुलियन कंपनीच्या आवारामधून महाराष्ट्र जीएसटी विभागाने हा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये १९ किलो वजनाच्या चांदीच्या विटा आणि तब्बल ९ कोटी ७८ लाख रुपयांची रोकड आहे.
हा ऐवज भिंतीत तसंच फरशीखालच्या फटींमध्ये सापडला आहे. या कारवाईनंतर या कंपनीचा परिसर सील करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here