ट्रक-जीपच्या भीषण अपघातात सहा ठार मृत लातूर जिल्ह्यातील

0
243
जामखेड न्युज – – – – 
 शहराजवळील सायगाव येथे खडी केंद्राजवळ भरधाव ट्रक व जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर अन्य काही जखमी आहेत.  सर्व मयत लातूर जिल्ह्यातील आहेत.ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.
लातूर जिल्ह्यातील आर्वी येथून जीपमधून (एमएच २४ व्ही- ८०६१) घरगुती कार्यक्रमासाठी एक कुटुंब अंबजोगाई तालुक्यातील राडी येथे जात होते. सायगावजवळ भरधाव ट्रकने (आरजे ११ जीए-९२१० ) जीपला समोरासमोर धडक दिली. यात सहा जण जागीच गतप्राण झाले. मृतांमध्ये पाच महिला व एक बालकाचा समावेश आहे.
दरम्यान, आणखी काही जखमी असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघातात जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here