जामखेड न्युज – – – –
जामखेड शहरातील नामांकित असलेल्या आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमात बक्षिसाची रक्कम साकत येथिल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित श्री साकेश्वर गोशाळेतील गायीच्या चाऱ्यांसाठी दिल्याने या अभिनव उपक्रमाबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आज दि. 11 एप्रिल रोजी, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल च्या वतीने शाळेचे अध्यक्ष प्राध्यापक कैलास माने सर यांचा मार्गदर्शना खाली शाळेचे प्राचार्य अभिजीत उगले सर व पारितोषिक विजेते विद्यार्थी यांनी आपल्याला मिळालेली बक्षीस रक्कम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलित साकेश्वर गोशाळेतील गोमातानां हिरवा चारा स्वरूपात देण्याचे ठरवले.
सुशिक्षित न होता सुसंस्कृत असावे हा खरा शिक्षणाचा उद्देश असावा, संस्कृती, प्राणी व पर्यावरण प्रेम या गुणांची जोपासना देखील शाळेतुन दिली जावे असे प्राचार्य ऊगले सरांनी सांगितले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग राजे भोसले, बंटी पाटील, प्राचार्य अभिजीत ऊगले सर, बांगर सर, ओक्सफोर्ड स्कुल चे विद्यार्थी उपस्थित राहून यांनी गोमातांना हिरवा चारा खाऊ घातला.
या अभिनव उपक्रमांबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.