तिसऱ्याच दिवशी दागिन्यांसह पळून गेलेल्या नववधूला अटक

0
290
जामखेड न्युज – – – – 
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खुलताबाद येथील एका तरुणाचे लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूने दागिन्यांसह एका कारमधून धूम ठोकल्याची घटना समोर आली होती. या नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. शुभांगी शिंदे असे अटक केलेल्या नवरी मुलीचे नाव आहे.
काल दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना त्या मुलीला अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी प्रभाकर शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई भोरे (मुलीची मावशी) अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती यांच्या मध्यस्थीतून हा सोहळा झाला होता. नवरदेवांकडील नातेवाइकांनी मुलीकडील मंडळींना १ लाख ३० हजार रोख व ७० हजारांचे सोने नवरीच्या अंगावर घातले होते.
२९ मार्च नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले. तेव्हा नवरदेव राजेश यास चकमा देऊन शुभांगी फरार झाली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसात नववधू शुभांगी शिंदे, पांडुरंग विनायक कदम, सपना साळवे, बाबूराव कदम खिल्लारेंसह सातजणांवर गुन्हा दाखल झाला होता. मुलाचे लग्न होत नसल्यामुळे त्रस्त असलेल्या कुटुंबाला शोधून दोन ते पाच लाखांत वधू विकणारे रॅकेट राज्यात सक्रिय झाले आहे.
मराठवाडा, खान्देशासह गुजरातमध्ये या रॅकेटने वधू विक्री करत कुटुंबांना फसवले. जळगाव शहरातील दोन महिला हे रॅकेट चालवतात. या दोघींनी स्वतःच्याच भाचीचे सहा महिन्यांत सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले अन् मुलीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. रॅकेट चालवणारी टोळी मात्र फरार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here