आंदोलकांनी घटनेआधी शरद पवारांच्या घराची रेकी केली; CCTV मधून खुलासा

0
265
जामखेड न्युज – – – – 
एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शरद पवारांच्या घराजवळ आंदोलन करण्याआधी त्यांच्या घराची रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाईल जप्त केले असून त्याचा आता तपास केला जात आहे.
मुंबई पोलिसांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांच्या घराजवळ केलेलं आंदोलन हा सर्व मोठा कट होता. त्यामुळे या परिसराची आधी रेकी केली होती. या परिसरातील आणि आझाद मैदानातील काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. गुन्हे नोंद करण्यात आलेल्या 109 लोकांपैकी काही लोकांची हालचाल ही शरद पवारांच्या निवासस्थानाच्या परिसरात आधीच दिसून आली होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने काल, शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here