जामखेड न्युज – – – –
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या साकत सेवा संस्थेची निवडणुक बिनविरोध करण्यात राजकीयदृष्टय़ा एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या
नेतेमंडळींना यश मिळाले आहे. साकतमधील नेतेमंडळींनी सर्वाना शेतकरी सभासद यांना विश्वासात घेत साकत सेवा
बिनविरोध करत तालुक्यात सर्वानाच आश्चर्यचकित केले आहे.
साकत सेवा संस्था बिनविरोध करण्यात पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरुमकर, माजी चेअरमन प्रा अरूण वराट, हनुमंत वराट, सुरेश वराट, सरपंच हनुमंत पाटील, माजी सरपंच कांतीलाल वराट, सदाशिव वराट, हरीभाऊ मुरुमकर, राजेंद्र वराट, नागेश वराट, विठ्ठल वराट, शहादेव वराट, जालिंदर नेमाने, विशाल नेमाने, भरत लहाने, अविन लहाने, महादेव वराट, प्रा भागवत वराट, महादेव वराट सर, राजाभाऊ तुकाराम वराट, बिभिषण वराट, नाशिक लहाने, कृष्णा पुलवळे, सचिन नेमाने, विजय घोलप, अजय नेमाने, अभिमान घोलप, दादासाहेब वराट, राजू मुरलीधर वराट, विशाल नेमाने, माणिक वराट, कैलास वराट, राम जावळे, विष्णु लहाने, भाऊसाहेब लहाने, युवराज मुरुमकर, पोपट मुरुमकर, बाळासाहेब सानप, मोहन अडसुळ, नागनाथ अडसुळ, रमेश अडसुळ यांची बिनविरोध साठी विशेष प्रयत्न केले.
साकत सेवा संस्थेसाठी एकुण ३९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील आज २६ जणांनी माघार घेतली त्यामुळे फक्त १३ उमेदवार शिल्लक राहिले हे सर्व बिनविरोध झाले ते पुढीलप्रमाणे साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या साकत ता.जामखेड जि.अहमदनगर व्यवस्थापक समिती निवडणुक सन २०२१-२०२२ ते २०२६-२०२७ दिनांक ०५/०४/२०२२ रोजीच्या माघारीनंतर शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची यादी
सर्वसधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी
वराट महादेव जिजाबा, नेमाने दादा रामभाऊ, वराट गणेश विठठल, वराट कैलास देवराव, लहाने नानासाहेब मारुती,
वराट हनुमंत माणिक, मुरुमकर विनोद राम, घोलप दिलीप रावसाहेब
महिला राखीव प्रतिनिधी
वराट जयश्री सुरेश, वराट इंदुबाई भागवत
इतर मागास प्रवर्ग
वराट पोपट आश्रु,
भटक्या विमुक्त जाती/जमाती
सानप पांडुरंग पंडीत
अनुसुचित जाती/जमाती
संस्था
पुलवळे भाउसाहेब काशिनाथ
अशा पद्धतीने १३ संचालक बिनविरोध ठरले आहे.
साकत सेवा बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट, भाजपाचा तसेच विखे पाटील गट एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे.
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वराट यांनी जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, गावाच्या विकासासाठी व शेतकरी हितासाठी आम्ही सर्वांनी एकत्र बसून सोसायटी बिनविरोध करून इतिहास घडविला आमदार रोहित (दादा) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली तसेच जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचेही सहकार्य लाभले त्यांनी सर्व नूतन संचालकांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. बिनविरोध झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
माजी चेअरमन प्रा. अरुण वराट यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत साकत सेवा संस्थेचा स्वच्छ व पारदर्शक सभासद हिताचा केला त्यावर विश्वास ठेवून हि निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले याबद्दल सर्व नेते, कार्यकर्ते व सभासदांचे आभार
पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर म्हणाले की, साकतच्या इतिहासात प्रथमच सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे आम्ही सर्वांनी एकत्र बसून गावाच्या विकासासाठी बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुक्यातील कोणत्याही नेत्यांनी ढवळाढवळ केली नाही. आम्ही ग्रामस्थांनी एकत्र बसून बिनविरोध केली नाराजांना भविष्यात संधी देण्यात येईल.