Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बॅनरची बिटंबना प्रकरणी बुधवारी जामखेड बंदची हाक

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बॅनरची बिटंबना प्रकरणी बुधवारी जामखेड बंदची हाक

0
312
जामखेड न्युज – – – – – 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खर्डा चौकात लावलेला फ्लेक्स बोर्ड  मुख्याधिकारी यांच्या आदेशावरून नगरपरिषद कर्मचारी शंकर बोराटे यांनी काढून टाकला. डॉ आंबेडकर यांच्या फोटोची विटंबना झाली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध व संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी म्हणून सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने जामखेड शहर बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे तसे निवेदन तहसीलदार यांना सर्व पक्षीय नेत्यांनी दिले आहे.
    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खर्डा चौकात बॅनर लावण्यात आला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या आदेशानुसार नगरपरिषद कर्मचारी शंकर बोराटे यांनी बॅनर काढला व कचर्‍याच्या गाडीत टाकला या बॅनरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, संत कबीर, गाडगेबाबा, अहिल्यादेवी होळकर, टिपू सुलतान, आण्णाभाऊ साठे, संत रोहिदास यांच्या प्रतिमा व चार दिवसाची कार्यक्रम पत्रिका होती. सदर बोर्ड काढताना महामानवांची विटंबना झालेली आहे. तेव्हा सदर दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई होईपर्यंत जामखेड शहर बंद ठेवण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अयोजीत कार्यक्रमाचे आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने शहरातील काही भागात बॅनर लावले होते.  जामखेड नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागप्रमुख शंकर बोराटे यांनी सदर बॅनर लावताना परवानगी घेतली नाही म्हणून ते बॅनर मुख्याधिकारी यांच्या परवानगीने उतरवले व त्यातील एक बॅनरची विटंबना झाली यामुळे संतप्त भिमसैनिक व नागरिकांनी याबाबत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना जाब विचारला व संबंधित कर्मचाऱ्या वर कारवाईची मागणी केली. परंतु नागरिकांचे समाधान झाले नाही.
यानंतर संतप्त नागरिकांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना भेटून प्रत्यक्ष घडलेली घटना सांगून संबधित कर्मचारी शंकर बोराटे यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी केली. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बरोबर चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करावे याबाबत सांगितले तसा प्रस्ताव तयार करावे असे सांगितले. यावेळी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. व जामखेड शहर बंद करून मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, विकास राळेभात, आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र सदाफुले, उपाध्यक्ष मुकुंद घायतडक, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन गडदे प्राचार्य विकी घायतडक, शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडूरंग भोसलेमनसेचे हवा सरनोबत, प्रदिप टाफरे मोठय़ा प्रमाणावर भिमसैनिक उपस्थित होते.
जामखेड बंद मागे घेण्यात यावा म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पण त्यास अपयश आले. रात्री उशिरापर्यंत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी संबधित कर्मचाऱ्याचे निलंबनाचे आदेश व विटंबना प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी पत्र देणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!