जामखेड न्युज – – – –
नसरापूर (Nasrapur) बनेश्वर वनउद्यानाच्या मागील शिवगंगा नदीच्या (Shivganga River) खोल डोहात चोरट्यांनी लपवलेली चंदनाची लाकडे (Sandle Wood) पुणे येथुन फिरावयास आलेल्या एका पोलिस कर्मचारयाच्या शोधक नजरेमुळे उघडकीस आली. नुकताच प्रसिध्द होऊन गाजलेल्या दक्षिणेतील `पुष्पा` चित्रपटाप्रमाणे (Pushpa Movie) नदीच्या पाण्यात लपवलेली चंदन सापडल्याने बनेश्वर उद्यानासह परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.आज गुढीपाडव्याच्या निमित्त् पुणे येथील दत्तवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सद्दाम शब्बीर शेख आपल्या कुटुंबीयांसह बनेश्वर वनउद्यानात फिरावयास आले होते. दुपारी उन्हाच्या वेळेत उद्यानामागील नदीच्या मोठ्या डोहात पोहण्यासाठी उतरले असताना त्यांना पाण्याच्या तळाशी लाकडी ओंडके असल्याचे जाणवले. त्यांनी एक लाकुड बाहेर काढुन बघीतले असता ते चंदनाचे लाकुड होते. यानंतर त्यांनी अजुन पाहीले असता लहान मोठी अशी दहा ते पंधरा चंदनाची लाकडे पाण्यात लपवलेली दिसली. ती त्यांनी बाहेर काढली व ते कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्यातील अधिकारयांना फोन करुन सांगितले.त्यांनी नसरापूर पोलिस ठाण्यात माहीती दिल्यावर तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सुतनासे, हवालदार संजय ढावरे यांनी सदर ठिकाणी जाऊन माहीती घेतली. व वनविभागाच्या कर्मचारयांना बोलावले. वनविभागाचे वनरक्षक बी एस तांबे, अशोक तांबे, संध्या कांबळे यांनी घटनास्थळी येऊन माळेगावचे सरपंच अमोल मोरे व रामदास राजपुरे यांच्या समक्ष पंचनामा करुन पाण्यातुन बाहेर काढलेले किंमती असलेले चंदनाचे ओंडके ताब्यात घेतले आहेत.
बनेश्वर वनउद्यान व परिसरातील शेतकरयांच्या शेता मधुन गेले अनेक महिन्यापासुन रात्रीच्या वेळी चंदनाच्या झाडांची चोरी होत आहे. अद्याप ते चंदन चोर सापडलेले नाहीत. याच टोळीने एकदम वाहतुक करणे शक्य न झाल्याने नदीच्या पाण्यात हे चंदनाचे ओंडके लपवले असण्याची शक्यता आहे. हे चोर या भागाची माहीती असलेले असुन नसरापूर परिसरातील हा `पुष्पा` कोण याची चर्चा या प्रकारा नंतर चांगलीच रंगली होती.कार्यतत्पर पोलिस कर्मचारी सद्दाम शेख यांच्या सतर्क नजरेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने वन विभाग नसरापूर पोलिस ठाणे नसरापूर व पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा बनेश्वर वनउद्यान कार्यालया जवळ सत्कार करण्यात आला.