जामखेड न्युज – – – – – –
लोकशाहीला दाबण्यासाठी ईडीचा वापर होतोय हे चुकीचे आहे. भाजपाच्या विरोधात बोलले कि, ईडीची धाड पडते भाजपाने ईडीचा वापर बागुलबुवा म्हणून सुरू केला आहे. ईडी मध्ये आगामी काळात मोठी भरती करावी लागेल कारण भाजपाच्या विरोधात कोणी बोलले की ईडीची धाड म्हणून भाजपाने ईडीचा वापर बागुलबुवा म्हणून सुरू केला आहे असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले.
जामखेडमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच कामांची पाहणी आमदार रोहित पवारांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची सविस्तर उत्तरे आमदार रोहित पवारांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे दिली याबाबत खुलासा करताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते कमी पडतात म्हणूनच भाजपने ‘मिशन- 2024’ अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता माजी मंत्री राम शिंदे यांना चिमटा काढला आहे. महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली असताना भाजपने मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याअंतर्गत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची जबबादारी देण्यात आली आहे.
युपीएच्या अध्यक्षपदाविषयी – – –
यूपीएच्या अध्यक्षपदावरुन भाजप नेते राम शिंदे यांनी ‘ते काय महाराष्ट्रातील पद नाही की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी शरद पवार यांच्या नावाचा ठराव मांडावा’ अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राम शिंदे काही एवढे मोठे नेते नाहीत की, त्यांच्याबद्दल बोलावं. भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने यूपीए अध्यक्षपदाबाबत भाष्य केलेलं नाही, असा टोला आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांना लगावला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी
संपाविषयी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने सहानुभूती दाखवून अनेक मागण्या मान्य केल्या आहेत तसेच वाढीव पगारवाढ दिली आहे. पण कर्मचारी चुकीच्या वकिलाकडे गेले आहेत तो वकिल राजकारण करत आहे. एखादा मुद्दा किती ताणून धरायचा हे कर्मचार्यांनीच पाहावे.
भाजपच्या कार्यकर्त्यांना दमबाजी विषयी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की दमबाजीचे समर्थन मी करणार नाही. पण ज्यांच्या विषयी आपण बोलत आहात त्याची आगोदरची भाषणे पाहावेत खालच्या पातळीवर जाऊन तो बोलत आहे हे कर्जत-जामखेड मधील जनतेला पटणारे नाही.