जामखेड न्युज – – – – –
जवळा सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी माजी सभापती सुभाष आव्हाड, प्रशांत शिंदे यांच्या विरोधात उपसभापती दिपक पवार, आजीनाथ हजारे, आदीनाथ कारखान्याचे आजी माजी संचालक यांच्या दोन गटात सरळ लढत होणार आहे. या सेवा संस्थेत २५ वर्षापूर्वी ज्येष्ठ नेते श्रीरंग कोल्हे यांची सत्ता होती. २०१६ रोजी प्रदीप पाटील यांनी सत्ताबदल केला होता. आता हे दोन्ही नेते दिवंगत झाले असल्याने त्यांच्या पाश्चात्य तालुक्यातील प्रथम क्रमांकाच्या या सोसायटीसाठी निवडणूक होत असून विक्रमी ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जवळा विविध कार्यकारी सेवा संस्था तालुक्यात प्रथम क्रमांकांची असून स्वताची दोन मजली इमारत आहे. तसेच वसुली ९० टक्के पेक्षा जास्त आहे. तालुक्यात सर्वात जास्त सभासद आहेत या सोसायटीचे आहे. ज्याच्याकडे सातबारा तो संस्थेचा सभासद व कर्ज तातडीने मिळते त्यामुळे या सोसायटीला शेतकऱ्यांनी पसंद केले असल्याने सतराशेच्या आसपास सभासद झाले आहेत. दिवंगत ज्येष्ठ नेते श्रीरंग कोल्हे यांनी ही संस्था ख-या अर्थाने ऊर्जीत अवस्थेत आणले आहे.
दिवंगत नेते श्रीरंग कोल्हे व प्रदीप पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे कार्यकर्ते
भाजपचे जिल्हा चिटणीस अजिनाथ हजारे, राष्ट्रवादीचे पं.स. माजी उपसभापती दिपक पाटील, जवळा गावचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच प्रदिप दळवी, भाजपचे माजी सरपंच शहाजी वाळुंजकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ.महादेव पवार, काँग्रेसचे आर. डी. पवार यांच्या गटात विभागले आहेत. त्यामुळे इच्छुकांची मोठी संख्या झाली असून तब्बल ४४ अर्ज या गटाकडून दाखल झाले आहेत.
पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर यांनी या निवडणुकीत स्वताचा पॅनेल उतरवला असून १३ जागेसाठी २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत यांचा उमेदवार विजयी झाल्यामुळे या मंडळाचा जोश वाढला आहे.
निवडणूक निमित्ताने सभासदांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत. शिवाय इच्छुक उमेदवारांकडून जेवणाच्या निमित्ताने बैठका बसू लागलेल्या आहेत. दोन्ही मंडळाचे पॅनेलप्रमुखांना उमेदवार निवडी साठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच विद्यमान संचालकापैकी अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवारी मिळावी याकरिता आपल्याच गटातील अन्य कार्यकर्त्यांवर कुरघोडी करून वर्चस्व दाखवण्याचे प्रयत्नही यानिमित्ताने सध्या सुरू आहेत.
जवळा सोसायटीच्या निवडणुकीसाठी माजी उपसभापती दिपक पाटील व आजीनाथ हजारे यांच्याकडे स्थानिक पातळीवरील मातब्बर नेते आहेत. आजीनाथ हजारे यांचा पतसंस्थेच्या माध्यमातून सोसायटी सभासदांचा दांडगा संपर्क आहे तर माजी सभापती सुभाष आव्हाड, जवळा सरपंच व उपसरपंच यांनी सोसायटीच्या निवडणुकीत भाग घेऊन ग्रामपंचायत बरोबर सोसायटी ताब्यात घेण्याचे लक्ष केले आहे. सदर निवडणूक स्थानिक पातळीवर सर्व पक्षभेद बाजुला ठेवुन होत असल्याने दोन्ही गटात सर्वपक्षीय उमेदवाराचा समावेश आहे. जवळा व पंचक्रोशीत सोसायटी निवडणूक बाबत जोरदार चुरस दिसून येत आहे.