जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील शिऊरचे शेतकरी शिवाजी लटके यांचा मुलगा कृष्णा यांची पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदी निवड झाली. आई-वडिल शेतकरी, आजोबा वैजिनाथ (नाना) लटके मंत्रालयात सचिव होते. चुलते बाळासाहेब लटके जामखेड तहसिलमध्ये अधिकारी आहेत. कृष्णाने याच दोघांचा वारसा पुढे चालवला आहे.
ADVERTISEMENT 

कृण्णा शिवाजी लटके यांची न्यायधीश या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी जामखेडचे कार्यतत्पर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, कृषी अधिकारी अशोक शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, युवराज पाटील जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना अहमदनगर, उपसरपंच विठ्ठल देवकाते, मिनीनाथ लटके, नाना सावंत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबातील मुलगा न्यायाधीश झाल्याने झाल्याने गावातील स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या मुलांना निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचा यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे. कृष्णा लटके हे सध्या पुण्यात वकिली करत होते.
ग्रामीण भागात शिक्षण घेऊन न्यायाधीश पदापर्यंत मजल मारता येते हेच लटके याने दाखवून दिले आहे माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय शिऊर येथे झाले होते. एलएलबीचे शिक्षण पुण्यात घेतले