‘युवक क्रांती दलाची जामखेड तालुका कार्यकारीणी जाहीर अध्यक्षपदी विशाल नेमाने तर सचिवपदी अनिल घोगरदरे यांची नियुक्ती

0
192

जामखेड न्युज – – – –

डॉ. कुमार सप्तर्षी प्रणित युवक क्रांती दलाची १७ सदस्यीय जामखेड तालुका कार्यकारीणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. युक्रांदचे सहकार्यवाह आप्पा अनारसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये तालुका अध्यक्षपदी विशाल नेमाने तर सचिवपदी अनिल घोगरदरे यांची नियुक्ती करण्यात आली.

ADVERTISEMENT

 

.

इतर कार्यकारीणी अशी उपाध्यक्षपदी विजय घोलप, योगेश अब्दुले, संघटक- जयराम झेंडे,

(सदस्य नावे …

एकूण 17 सदस्यांची ‘युवक क्रांती दल’ जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कर्जत तालुका कार्यकारिणीचे सचिव रुद्रदादा राऊत उपस्थित होते तसेच ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण घोलप आणि आप्पासाहेब घोलप यांचीही उपस्थिती होती. जामखेड येथील अहमदनगर रोडवरील सभागृहामध्ये कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी युवक, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची उपस्थिती होती. तुकाराम घोगरदरे, भुषण काकडे, ऋषिकेश घोलप, अशोक नेमाने, विनोद नेमाने, सर्जेराव गांगर्डे, निलेश नेमाने, विशाल रेडे, विशाल राऊत, लहु नेमाने, कृष्णा पवार, देवेंद्र घोलप, योगेश नेमाने हे सदस्य उपस्थित होते.

जामखेड तालुक्यामध्ये महिला, विद्यार्थी, युवक आणि शेतकरी यांच्या विविध प्रश्नांवर युवक क्रांती दल कार्य करणार आहे. सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये युक्रांद काम करणार आहे. संविधानाला मध्यवर्ती मानून त्या विचारानुसार सर्व सदस्यांनी कार्यरत राहण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांसाठी तालुक्यामध्ये विजेच्या प्रश्नावर तसेच सरकारी हमी भाव खरेदी केंद्र याबाबत युवक क्रांती दल पाठपुरावा करणार आहे. येत्या काळामध्ये तालुक्यात युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवक क्रांती दल शेतकरी, तरूण, महिला यांच्या प्रश्नावर काम करत आहे. दुधाच्या प्रश्नावरही युक्रांदने यशस्वी लढा दिला. सध्या मोठया प्रमाणावर तरुण युक्रांदच्या विचारधारेकडे वळत आहेत. यातूनच जामखेड तालुका कार्यकारणीची निवड झाली आहे. अन्यायाविरुध्द आक्रमकपणे सत्याग्रही मार्गाने युक्रांद जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडत आहे.
समाजासाठी काही तरी वेगळं करू पाहणाऱ्यांसाठी युक्रांदचे व्यासपीठ खुले आहे.
अप्पा अनारसे (सहकार्यवाह, युक्रांद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here