जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणार्या कुसडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पै. बापुसाहेब दत्तात्रय कार्ले तर उपसरपंच पदी नागेश कात्रजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कुसडगावच्या ग्रामपंचायत साठी मनसे नेते पै. दादासाहेब ( हवाशेठ ) सरनोबत रामचंद्र भोगल यांच्या नेतृत्वाखाली विलास सासवडकर, शहाजी वटाणे, संभाजी वटाणे, दिलीप गंभीरे, रामचंद्र शिरसाठ, आबासाहेब कात्रजकर, केशव कात्रजकर, प्रसन्न कात्रजकर, भरत भोगल, निलेश वटाणे, विजय वाघ, सुखदेव जगताप, अनिल जगताप, शिवाजी जगताप, पिराजी वटाणे, तसेच कुसडगाव, भोगलवाडी व सरदवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व च्या सर्व नऊ जागा बहुमताने जिंकल्या होत्या.

सकाळी आकरा वाजता सरपंच पदासाठी बापुसाहेब कार्ले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यास सूचक म्हणून रूपचंद वाटाणे होते तर उपसरपंच पदासाठी नागेश कात्रजकर यांनी अर्ज दाखल केला त्यांना सूचक म्हणून मधुकर खरात होते. विहित मुदतीत सरपंच पदासाठी एकच व उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक अभ्यासी अधिकारी प्रफुल्ल पाटील व सहाय्यक किशोर टकले यांनी सरपंच पदी बापुसाहेब कार्ले तर उपसरपंच पदी नागेश कात्रजकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यावेळी बोलताना सरपंच कार्ले व उपसरपंच कात्रजकर यांनी सांगितले की, आम्ही हवाशेठ सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गट तट न ठेवता कुसडगाव परीसराचा निश्चितपणे कायापालट करू असे जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.