बापुराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरखेड ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात सरपंचपदी कांचन ढवळे तर उपसरपंचपदी अविनाश गायकवाड यांची निवड

1
409

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंपरखेड ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी कांचन बापुराव ढवळे तर उपसरपंचपदी अविनाश अशोक गायकवाड यांची निवड झाली आहे. यामुळे सलग तिसऱ्यांदा भाजपाने बापुराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने ग्रामपंचायतीची सत्ता राखली आहे. यामुळे विजयाची हॅटट्रिक झाली आहे.
सरपंचपदासाठी कांचन बापुराव ढवळे तर तर स्वाती विशाल गाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर उपसरपंच पदासाठी अविनाश अशोक गायकवाड व सुशिला सुनील ओमासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये कांचन ढवळे यांना सहा तर स्वाती गाडेकर यांना पाच मते मिळाली त्यामुळे सरपंच पदी कांचन ढवळे याची निवड करण्यात आली तर उपसरपंचासाठी अविनाश गायकवाड व सुशीला ओमासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामधे अविनाश गायकवाड यांना सहा तर ओमासे यांना पाच मते मिळाली त्यामुळे गायकवाड यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली असे निवडणूक अभ्यासी अधिकारी दिपक लोंढे व सहाय्यक आर आर. राठोड यांनी जाहीर केले
   पिंपखेड हसनाबाद ग्रामविकास पॅनलने अकरा पैकी सहा जागा जिंकल्या होत्या दहा वर्षे केलेल्या विकास कामांमुळे परत जनतेने बापुराव ढवळे यांच्यावर विश्वास टाकला आहे त्यामुळे परत एकदा संधी मिळाली आहे.
सरपंच कांचन ढवळे यांनी सांगितले की लोकांनी टाकलेल्या विश्वासास तडा जाऊ न देता गट तट न ठेवता पिंपरखेडचा कायापालट करण्याचा विश्वास व्यक्त केला.
सरपंच व उपसरपंच निवडी जाहिर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
    यावेळी बोलताना बापुराव ढवळे म्हणाले की, लोकांनी तिसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही केलेल्या विकास कामांमुळे विश्वास टाकला आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विकासकामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राहिलेली विकास कामे मार्गी लावली जातील. तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात विकास कामांमुळे वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास ढवळे यांनी व्यक्त केला.
  विकास कामांमुळे बापुराव ढवळे यांनी पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायत मध्ये विजयाची हॅटट्रिक केली आहे

1 COMMENT

  1. आपल्या न्यूज चॅनेल ची ग्रुप लिंक आहे का असेल तर पाठवा व्हाट्सएप नं 9730203351

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here