शाॅटसर्किटमुळे एक एकर ऊस जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान

0
256

जामखेड प्रतिनिधी

              जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी गायत्री संतोष उगले यांच्या गट नंबर ११९ मध्ये शाॅटसर्किटमुळे आगीच्या ठिणग्या पडून एक एकर ऊस जळून खाक झाला आहे. यात उगले यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
   नायगाव शिवारात गट नंबर ११९ मध्ये गायत्री संतोष उगले यांची शेती आहे या शेतीत महावितरण कंपनीच्या विजेच्या तारा गेलेल्या आहेत. या तारांना खुपच झोळ निर्माण झाला आहे. यामुळे एखादा पक्षी बसला किंवा जोरदार वारे सुटले तर तारा एकमेकांना चिकटतात व पार्किंग होऊन ठिणग्या पडतात वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही तारा तशाच राहिल्या यातूनच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
                       ADVERTISEMENT
     तालुक्यात अनेक ठिकाणी महावितरणचा भोंगळा कारभार आहे. तारा खुपच ढिल्ल्या आहेत यातून मोठा अनर्थ उद्भवू शकतो तेव्हा ताबडतोब तारा व्यवस्थित करणे आवश्यक आहे. एक तर सध्या अतिरिक्त ऊसाची समस्या आहे. ऊसाला तुरे फुटलेले आहेत यात महावितरणचा भोंगळा कारभार यामुळे शेतकरी भरडला जात आहे. उगले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here