जामखेड न्युज – – – –
पैशाचे व लग्नाचे आमिष दाखवून एका 35 वर्षीय युवकाकडून शंभर रुपयाच्या बोर्डवर घोषणापत्र लिहून घेत धर्मांतर करून घेतल्याचा प्रकार बीडच्या परळीमध्ये समोर आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, धर्मांतर केल्यानंतर या तरुणाची पुन्हा एकदा धर्मवापसी सुद्धा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT 

परळी तालुक्यातील मांडवा येथील ज्ञानेश्वर मनोहर नागरगोजे या 35 वर्षीय युवकाचे धर्मांतर व पुन्हा धर्म वापसी प्रकरणाने आमिष दाखवून धर्मांतर करणारे रॅकेट सक्रिय तर नाहींना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्ञानेश्वरला मुस्लीम धर्म स्विकारण्यासाठी पैसे व मुस्लीम मुलीशी लग्न करुन देण्याचे आमिष दाखविल्याचे नमुद केले आहे.
मांडवा येथील ज्ञानेश्वर मनोहर नागरगोजे वय 35 वर्षे या तरुणाने आपण मुस्लीम धर्माचा अभ्यास केला असून आत्मचिंतन करुन इस्लामची शिकवण खऱ्या अर्थाने प्रभावशाली आहे. एकेश्वरवाद प्रेषित मोहम्मद पैगंबर चरित्र, विश्वबंधुत्ववाद याचा अभ्यास करताना पायीक झालो व स्वखुशीने, स्वंयप्रेरणेणे भारतीय राज्य घटनेच्या कलम 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार वापरुन दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी मुस्लीम धर्म स्विकारला. मोहंमद शाहजाद मनोहर असे नाव बदलले असल्याचे नोटरी केलेले बॉण्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.
यानंतर ज्ञानेश्वर याचा नोटरी केलेला बॉण्ड दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आला व त्यात आपण हिंदू धर्मातच असल्याचे सांगून 11 फेब्रुवारी रोजी माझी मानसिक स्थिती ठीक नसल्याचा गैरफायदा घेवून परळी व बीड येथील समाजकंटकांनी तुला अडचणीतून सोडवतो, पैसे देतो, मुस्लीम मुलीबरोबर लग्न लावून देतो असे म्हणून घोषणापत्र लिहून घेतले.
परंतु मला मुस्लीम धर्माची तत्वे मान्य नाहीत, मी मुस्लीम धर्माचा कधीही अभ्यास केला नाही माझे महंमद शाहजाद मनोहर असे नावही बदलले नाही व त्याबाबत गॅझेट प्रसिद्ध केलेले नाही, असे नमुद केले आहे.
ज्ञानेश्वर मला भेटला आणि त्याने त्याची अडचण समजून सांगितली त्यानंतर मी त्याला दुसरे करायला सांगितले त्यात मी कुठलाही धर्म बदलला नाही अशा पद्धतीचा मी त्याला करायला सांगितले. त्यामुळे वकील म्हणून मी माझे कर्तव्य पूर्ण केले असे ऍड आर.व्ही. देशमुख यांनी सांगितलंय.
तर, ज्ञानेश्वर हा सतत मानसिक तणावाखाली तो असतो. एखाद्याने कुठलेही प्रलोभन दाखवले की, तो त्या व्यक्तीसारखे वागतो, बोलतो व करतो त्यातूनच हा प्रकार झालेला असावा, या प्रकरणाशी कुटुंब व नातलगांशी कसलाच संबंध नसल्याचे काही त्याच्या मोठ्या भावाने सांगितले. या प्रकरणासंदर्भात आम्हाला कुठेही तक्रार करायची नाही कृपया आमची बदनामी थांबवा अशी विनंतीही केली.