सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना जिद्द व चिकाटीच्या बळावर झाला पीएसआय

0
259
जामखेड न्युज – – – – 
 नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माळाकोळी गावातील गोपीनाथ केंद्रे (Gopinath Kendre) या तरुणाची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली आहे. गोपीनाथ यांनी अनेक आव्हानांना तोंड देत घरची परिस्थिती हलाकीची असताना हे यश संपादन केलंय. गोपीनाथ यांनी मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम केलंय सात वर्षे कष्ट करून, अभ्यास करत 2019 ची परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळवलं. त्याचा निकाल 8 मार्च 2022 रोजी जाहीर झाला. महाराष्ट्रात त्यांचा 32वा क्रमांक आहे. मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाल्याने आईवडिलांना आनंद झाला आहे.गोपीनाथ केंद्रे हे नांदेड जिल्ह्यातील माळाकुळी गावातील आहेत.गावात प्राथमिक आणि माध्यमकि शिक्षण घेऊन महाविद्यालयीनं शिक्षणासाठी पुण्यात आले. सुरक्षा रक्षकाचं काम करत करत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
                  ADVERTISEMENT
मित्रांची साथ लाभली
महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती. अभ्यास करत असताना आर्थिक अडचणींमुळं गोपीनाथ यांनी मुंबईत सुरक्षा रक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली. मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत करत अभ्यास केला, आता त्या अभ्यासाचं फळ मिळाला. ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी कोणी विचारत नव्हतं. आता, निकाल लागल्यानंतर सर्व जण अभिनंदन करतात, असं गोपीनाथ केंद्रे यांनी सांगितलं. मला मिळालेल्या यशात आई, वडिल, पत्नी आणि मित्रांचं महत्त्वाचा वाटा असल्याचं गोपीनाथ केंद्रे म्हणाले. 2019 मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मुलाखतीत सर्वाधिक गुण मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
गोपीनाथ केंद्रे यांच्या यशाचा आई वडिलांना आनंद
किसन केंद्रे यांनी आम्ही रोजगार आणि नोकरी करत मुलांना आम्ही शिकवलं, आमचा मुलगा नोकरी लागणार असल्यानं आनंद वाटतो, असं म्हटलं.
शिक्षण हे गरजेचं आहे. सरकारी नोकरी मिळाल्यानं आता आनंद वाटतो. सणाच्या दिवशी आम्हाला कधी कधी खायला मिळत नव्हतं पण आता आनंद वाटतो. आता मुलं शिकत आहेत. आमच्या मोठ्या मुलानं गोपीनाथ याला शिक्षणासाठी पैसे दिले. आता नोकरी मिळणार आहे तर आनंद वाटतो, असं आशाबाई केंद्रे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here