जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी असलेले नागनाथ शिंदे यांची नुकतीच बीड येथे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यामुळे जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण गायकवाड, सचिव रमेश बोलभट, उपाध्यक्ष सुर्यकांत कदम टिडिएफ सचिव भरत लहाने, उपाध्यक्ष अनिल देडे, नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश तांबे, टिडिएफचे माजी अध्यक्ष व ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी उपाध्यक्ष व ल. ना. होशिंग विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश अडसूळ, शहाजी वायकर, योग शिक्षक बाळासाहेब पारखे, मयुर भोसले, सुग्रीव ठाकरे,
अत्यंत हुशार व कार्यकुशल अधिकारी व शिंदे यांची ओळख आहे. अगदी प्राथमिक शिक्षक पदापासून ते शिक्षणाधिकारी पदापर्यंत ते कष्टाने गेलेले आहेत जामखेड तालुक्यात शिक्षक म्हणून 15 वर्षे सेवा केली तसेच
शिक्षण विस्तारअधिकारी 5 वर्षे तर गटशिक्षणाधिकारी म्हणून बीड जिल्ह्य़ातील गेवराई, अंबाजोगाई नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, जामखेड येथे 11 वर्षे सेवा केली सध्या ते जामखेड येथेच गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते आता त्यांची बीड येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला