जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना ४ मार्च २०२२ पर्यंत तहसील कार्यालय येथे दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार जामखेड यांनी केले आहे
जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित, निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत दि. २०१९ मध्ये दिलेला कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने राबविल्यामुळे सर्व निवडणुक कार्यक्रम रद केलेल्या जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागाच्या रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये शिऊर, राजुरी, रत्नापुर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सदर प्रारूप प्रभाग रचना तहसील, पंचायत समिती, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. तेव्हा या ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी ४ मार्च २०२२ पर्यंत हरकती नोंदवाव्यात. असे आवाहन तहसीलदार जामखेड यांनी केले आहे.