जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
गेल्या अनेक महिन्यांपासून एस टी संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एस टी वरील हल्ले थांबायला तयार नाहीत. जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा अगाराच्या बस वर काल रात्री साडेसात च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटला नसला तरी मात्र कारवाई च्या भीतीपोटी या संपाला विरोध करत अनेक बस चालक व वाहक कामावर हजर झाले आहेत. दि २४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पाटोदा अगाराची बस क्रमांक एम .एच -20, बी.एल. ३९७२, पुणे – पाटोदा ही बस पाटोदा या ठिकाणी चालली होती. याच दरम्यान जामखेड – सौताडा रोडवर ही बस आली आसता अंधाराचा फायदा घेत मोटारसायकल वर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी या बसवर दगडफेक केली. या मध्ये बस च्या काचेचे नुकसान झाले आहे. या नंतर तातडीने बस चालकाने ही बस जामखेड पोलीस स्टेशनला आणत तक्रार दाखल केली. यावरून अज्ञात हल्लेखोरांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नंतर प्रवाशांना घेऊन ही बस पाटोद्याकडे रवाना झाली आहे.
या पुर्वी देखील मागिल महिन्यात
हरीणारायण आष्टाहद्दी जवळील गांधनवाडी फटा या ठिकाणी जामखेड अगाराच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली होती. या नंतर पुन्हा मोहा फाटा येथे दुसर्यांदा बरवर दगडफेक झाल्याने हजर झालेल्या एस टी कर्मचाऱ्यान मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.