जामखेड न्युज – – – –
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालयात आज गोळीबार झाल्याची चर्चा असून यामध्ये दोनजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
जमिनीच्या वादातून हा प्रकार आज सकाळी ११ च्या सुमारास घडला आहे. सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागल्याने तर फारुख सिद्दीकी यांच्या पायाला गोळी चाटून गेली असून हे दोघे जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. दोघां जखमीवर उपचार सुरू आहेत. बीडचे रजिस्ट्री कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आहे. येथेच गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बीड पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.