जामखेड न्युज – – – –
नुकतेच जिल्हा परिषद अहमदनगर यांनी जिल्ह्यात 170 उपाध्यापकाना मुख्याध्यापक पदी पदोन्नती दिली यामध्ये शिक्षकनेते राम निकम यांना मुख्याध्यापक म्हणून जि. प. प्रा. शाळा खर्डा मुले येथे पदोन्नती मिळाली आहे,ते खर्डा शाळेत हजर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश गोलेकर, ग्रा प सदस्य वैभव जामकावळे, दिगंबर थोरात, पोपट भुते, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष ज्ञानोबा थोरात, केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते, शाळेतील शिक्षक आदींनी त्यांचे स्वागत केले राम निकम हे यापूर्वी जि प प्रा शाळा फक्राबाद येथे कार्यरत होते, त्यांची आजपर्यंत 32 वर्ष सेवा झाली आहे
यापूर्वी त्यांनी सावरगाव, मोहा, देवदैठण, फक्राबाद या ठिकाणी नोकरी केली आहे,त्यांना जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे, शिक्षक संघटनेच्या कामात व शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सक्रिय असतात, फक्राबाद येथे गुणवत्ता वाढीबरीबरच शाळेच्या भौतिक सुविधा मिळवणे, मुलांना ऑनलाईन शिक्षण देणे,झूम मिटिंगा घेणे या बाबीवर विशेष लक्ष दिले होते ,खर्डा विभागातील सर्व शिक्षक व ग्रामस्थ खर्डा शाळेस मुख्याध्यपक आल्यामुळे आनंदी झाले आहेत