भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने दिली पलकसह तिघांना शिक्षा

0
248
जामखेड न्युज – – – – 
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात इंदौर न्यायालयाने आज निकाल दिला. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शिष्या पलक, मुख्य सेवक विनायक आणि चालक शरदला दोषी ठरवलं आहे. या तिघांनाही न्यायालयाने सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भय्यू महाराज यांनी 2018 मध्ये स्वतःजवळील परवानाधारक पिस्तुलने गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती.
कौटुंबिक कलह आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, नंतर या प्रकरणी इंदूर पोलिसांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या तिघांना अटक केलं होतं. यात एका शिष्येचाही समावेश होता. त्याचबरोबर भय्यू महाराज यांचा मुख्य सेवक विनायक दुधाळे आणि चालक शरद देशमुख यांनाही पोलिसांनी अटक केली होती. यात एका तरुणीचाही समावेश होता. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये उकळले, असा आरोप झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी पलकने भय्यू महाराज यांच्यासोबत अश्लील व्हिडीओ बनवले होते. त्यानंतर तिने सेवकांच्या मार्फत भय्यू महाराजांनी ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. आपल्यासोबत लग्न करण्यासाठी तिने भय्यू महाराजांवर दबाव देखील आणला होता. मात्र भय्यू महाराजांनी आयुषीसोबत लग्न केलं होतं.
लग्नानंतर आरोपी तरुणीने आणि तिच्या साथीदारांनी भय्यू महाराजांचा छळ सुरू केला. कित्येक वेळा त्यांनी महाराजांकडून पैसे उकळले. भय्यूजी महाराज यांच्याजवळ एक सुसाईट नोटही सापडली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे सेवक असलेल्या विनायकचा उल्लेख केला होता.
कोण होते भय्यूजी महाराज?
देशभरातील विविध राज्यांमधील राजकीय नेते व चित्रपट अभिनेते भय्यू महाराज यांचे अनुयायी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील हे त्यांच्याकडे चर्चेसाठी जात असत. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोठे काम केले. मराठवाड्यात त्यांच्या संस्थेने 500 तलाव खोदले आहेत. वृक्षारोपण चळवळीला त्यांनी मोठी चालना दिली. लोकांकडून ते काहीही भेटवस्तू स्वीकारत नसत. त्याऐवजी एक झाड लावा, असे ते सांगत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here