सात हजार आठशे शिक्षक बोगस – पोलीस आयुक्त. बोगस पद्धतीनं भरती झालेल्या शिक्षकांना पदमुक्त करणार

0
234
जामखेड न्युज – – – – 
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उतीर्ण केल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी (Amitabh Gupta) महत्वाची माहिती दिलीय. टीईटी परिक्षेत सात हजार आठशे शिक्षक बोगस पद्धतीने पात्र झाल्याचे स्पष्ट झालंय.  त्यांची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला दिली जाईल. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनाही अटक करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, 2019- 2020 च्या टीईटी परिक्षेत सात हजार 800 शिक्षक बोगस पद्धतीने पात्र झाल्याचे स्पष्ट झालंय. त्यांची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला दिली जाईल. त्यांच्यावर पुढची कारवाई शिक्षण परिषदेकडून होईल. परंतु, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणखी व्यक्तींना येत्या काही दिवसांत अटक होईल. यात काही एजंट्स आहेत. तर, काही अधिकारी आहेत. पेपर फुटीत आणि परिक्षा भरती घोटाळ्यात अटक आरोपींची संख्या चाळीस पर्यंत पोहचलीय, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिलीय.
दत्तात्रय जगताप काय म्हणाले?
सायबर पोलीसांच्या तपासात निष्पन्न सात हजार आठशे शिक्षक बोगस पद्धतीनं भरती झाल्याचं उघड झालंय. हे सात हजार आठशे शिक्षक जर भरती झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना पदमुक्त केलं जाईल. 2013 पासून टीईटी परिक्षेत घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळं राज्यभरातून शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागविण्यात आली आहेत. आतापर्यंत 6 हजार 700 प्रणामपत्र जमा झाली. या सहा हजार सातशे शिक्षकांपैकी जे शिक्षक बोगस पद्धतीनं भ्रती झाले असतील त्यांना पदमुक्त केले जाईल आणि फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल. अद्याप नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर महापालिकेची आकडेवारी यायची आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे 10 कर्मचारी सध्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन सायबर पोलीसांना मदत करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here