जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
तालुक्यातील आपटी , पिंपळगाव आवळा व वाघा परीसरात भरदिवसा घरफोड्या करुन तीन चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचा पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. मात्र वाघा ग्रामस्थ व उपसरपंच शिवाजी बारस्कर यांच्या तत्परतेमुळे व ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे तिन्ही चोरांना त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीबद्दल उपसरपंच व वाघा ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि १५ रोजी सकाळी पिंपळगाव आवळा येथील गणेश मधुकर ढगे हे सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून शेतात गेले होते. यानंतर फिर्यादी यांचे वडील मधुकर ढगे हे दुपारी १ : ४५ वाजे दरम्यान घरी आले आसता, घरात चोरी होऊन, घरातील २५ हजार रुपये रोख व ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरुन नेला आसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर फिर्यादी गणेश ढगे यांनी गावात अधिक माहिती घेतली असता हबीब बाबुलाल शेख, सय्यद नबीलाला शेख, सलिम नबीलाला शेख व आपटी येथील सावकार साहेबराव जगदाळे, मिलिंद सावकार जगदाळे, किरण अजिनाथ खुपसे, यांच्याही घरी चोरी झाली होऊन सोन्या चांदीचा ऐवज चोरटय़ांनी चोरुन नेला आसल्याचे समजले.
एवढ्यावरच न थांबता चोरटय़ांनी आपला मोर्चा वाघा गावाकडे वळवला. दुपारी सव्वातीन वाजे दरम्यान याच ३ चोरट्यांनी वाघा येथील घटनेतील फिर्यादी सुमंत मारुती जगदाळे यांच्या घराकडे वळविला. येथील फिर्यादी ही घराला कुलूप लावून शेतातच गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून २२ हजार रु रोख व ४२ हजारांचा सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
दरम्यान वाघा येथील उपसरपंच शिवाजी बारस्कर यांना आपल्या गावात चोरी झाल्याची घटना समजली. त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या नंबरवर वर कॉल करुन गावातील लोकांना सावध केले. त्यामुळे गावातील लोक एकत्र जमा होऊन या चोरट्यांचा शोध घेत आसताना यातील ३ चोरटे मोटारसायकलसह गावात चोरी करताना अढळुन आले. या नंतर ही घटना उपसरपंच शिवाजी बारस्कर यांनी जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळविले. त्यांनी तातडीने त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, संजय लोखंडे, विजय कोळी, संदीप राऊत, संग्राम जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आदित्य उर्फ सोंड्या गणेश पिंपळे ( वय वर्ष २०) राहणार, अशोक नगर, श्रीरामपूर, प्रदीप उर्फ चक्क्या चंद्रकांत काळे (वय २१ वर्ष), बाबू फुलचंद काळे (वय २४ वर्ष), दोघेही रा, सदाफुले वस्ती, जामखेड अशा तीन चोरट्यांना ग्रामस्थांकडुन ताब्यात घेतले व अटक केली.
या तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात व पोलीस हेडकाॅस्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.
अशा प्रकारच्या अप्रिय व संपत्तीची हानी टाळण्यासाठी तालुक्यातील जनतेने ग्रामसुरक्षा यंत्रणेशी सलग्न व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले यावेळी केले आहे