जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
लोकप्रिय आमदार तसेच तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारे रोहित (दादा ) पवार यांना नुकताच कोरोना झालेला आहे तेव्हा ते कोरोना आजारातून लवकर बरे व्हावेत म्हणून जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात सावळेश्वर समूहाचे अध्यक्ष रमेश दादा आजबे यांनी अभिषेक घातला. व नागेश्वराकडे प्रार्थना केली की रोहित दादांना लवकरात लवकर बरे वाटावे.
त्यावेळी सावरगावचे माजी सरपंच दादासाहेब ढवळे, विश्वास मजूर संस्थेचे चेअरमन संजय बापु बेरड, धोत्री गावचे युवा उद्योजक घनश्याम अडाले, सचिन खैरे, विनोद डिसले, मैनुद्दीन शेख, पिंटू ईगोले, पप्पु साळुंके त्यावेळी हेही उपस्थित होते.