राज्यात कोरोनाचा हाकाकार, आजची आकडेवारी धडकी भरवणारी

0
191
जामखेड न्युज – – – 
 राज्यात कोरोनाचा व्हायरसचा (corona virus) विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच नवीन आलेल्या ओमायक्रॉन (omicron) व्हेरिएंटने देखील अनेकांना बाधित (positive) करण्यास सुरूवात केली आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे तब्बल 26 नवे रुग्ण आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 15 हजार रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहे.
                               ADVERTISEMENT
                 
ओमिक्रॉनचाही कहर सुरूच
राज्यात आज ओमायक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनचे टेंन्शन वाढले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत 100 रुग्णांची नोंद झाल्याने मुंबई पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. दिवसभरात नागपूरमध्ये 11 तर ठाणे आणि पुणे मनपा प्रत्येकी 7 ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
                    ADVERTISEMENT
ओमायक्रॉन रुग्णसंख्या 997 वर
दरम्यान राज्यात कोरोना व्हायरस बरोबरच नवीन आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने देखील हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. राज्यात आतापर्यंत 797 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची ही स्फोटक वाढ धडकी भरवणारी आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने
आज मुंबईत तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं सुरु आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मुंबईसह उपनगरांचा धोका वाढला
ठाणे जिल्ह्यात 4721 कोरोना रुग्ण दिवसभरात आढळून आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात झालेली रुग्णवाढही मोठी आहे. कामधंद्यासाठी उपनगरातून मुंबईत येणाऱ्यांची सख्या मोठी असते, त्यामुळे उपनगरातील कोरोनाचा विळखाही वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here