राम मुरुमकर यांच्या सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

0
256
जामखेड न्युज – – – 
    राम बाबासाहेब मुरुमकर यांनी वनविभागात २९ वर्षे विनातक्रार सेवा केली काल ते सेवानिवृत्त झाले यानिमित्ताने त्यांनी गावातील स्मशानभूमीत ६१ झाडे लावण्याचा संकल्प केला व विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माजी मंत्री प्रा राम शिंदे हे मुरुमकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती पिंटु काका जाधव, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, उपसभापती रवी दादा सुरवसे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण,  शिवाजी काका काकडे, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती गौतम उतेकर, साकतचे सरपंच हनुमंत काका पाटील, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, आरणगावचे सरपंच लहु शिंदे, धामणगावचे सरपंच महारुद्र महारणवर,  माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित शेठ चिंतामणी, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक दादा कोल्हे, मिलिंद घोडेस्वार, राजाभाऊ कोल्हे, महारुद्र नेमाने, आप्पासाहेब मुरुमकर, बाळासाहेब वराट
व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here