जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
अपघातात जखमी झालेल्या पेशन्टचा पन्हाळकर हाॅस्पिटलमध्ये दाखल करून एक्सरे काढला तेव्हा एक्सरेची तीनशे रुपये फि भरा म्हटल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी व डाँ पन्हाळकर यांना घाण घाण शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्याने मारहान केली, त्यानंतर आरोपी हाँस्पिटलचे बाहेर जावुन पाण्याचे बोअरचा नुकसान करून पाईप तोडुन, प्लंबीगचा पाईप व दगड हातामध्ये घेऊन दहशत निर्माण केली व जर कोणी तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली तशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी विनोद अरूण डोके वय 28 वर्षे धंदा खाजगी नोकरी (पन्हाळकर हाँस्पिटल, जामखेड मध्ये, आँपरेश थिएटर सहाय्यक ) रा. मातकुळी ता. आष्टी जि. बीड हल्ली रा. पन्हाळकर हाँस्पिटल, यांनी आरोपी 1.दिपक चव्हाण व 2.आनंद बाळासाहेब मोरे दोघे रा. जामखेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT 

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,
दि. १ रोजी सकाळी आरोपी हे पेशंट नामे महेश ऊर्फ भैय्या परदेशी यास अपघातामध्ये मार लागल्याने उपचाराकरीता हाँस्पिटलमध्ये घेवुन आले, त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी क्रं.1 दिपक चव्हाण यास X-RAY चे 300/- रू फिस भरा व जखमीचे डोळ्याला मार लागल्यामुळे पेशंटला डोळ्याचे दवाखाण्यामध्ये घेवुन जा असे म्हणाल्याचा, आरोपीस राग आल्याने, त्यांनी फिर्यादी व डाँ पन्हाळकर यांना घाण घाण शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्याने मारहान केली, त्यानंतर आरोपी हाँस्पिटलचे बाहेर जावुन पाण्याचे बोअरचा नुकसान करून पाईप तोडुन, प्लंबीगचा पाईप व दगड हातामध्ये घेवुन मारणयास आले व आरोपी क्रं.1 हा तेथे असलेल्या पेशंट व त्यांचे नातेवाईकांकडे पाहुन म्हणाला की, माझ्या विरूध्द कोणी तक्रार दिली तर, मी जिवे मारून टाकील अशी धमकी दिल्याने तेथे असलेले पेशंट व त्यांचे नातेवाईक पळुन गेले,
त्यानंतर पुन्हा 07.45 वा चे सुमारास आरोपी क्रं.1 हा त्याचे कार नंबर MH-08-AC-9394 मधुन लोखंडी राँड घेवुन हाँस्पिटलमध्ये शिवीगाळ करत आला व फिर्यादीस जिवे मारण्याचे उद्देशाने डोक्यावर लोखंडी राँड मारला तो फिर्यादीने हुकविला त्यामुळे माझा जिव वाचला, त्यानंतर पुन्हा फिर्यादीचे डोक्याकडे जोराने मारला परंतु फिर्यादी तो ही हुकवुन तेथुन पळुन जावुन हाँस्पिटलचे रूम मध्ये लपुन बसले, त्यानंतर तेथे डाँक्टर व हाँस्पिटलाचा स्टाफ आल्याने वरील आरोपी तेथुन जाताना आरोपी क्रं.1 हा म्हणाला की, तु आता वाचलास तु परत भेट तुला गोळया घालुन जिवे ठार मारतो अशी धमकी दिली आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून गुन्हा रजि दाखल केला आहे.
गु रजि नं.व कलम 01/2022 भा.द.वि. कलम 307, 323, 504, 506, 427, 34 व महाराष्ट्र वैदयकिय सेवा-व्यक्ती आणि वैदयकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी यांना प्रतिबंध) अधिनीयम 2010 चे कलम 4 प्रमाणे दिपक चव्हाण व आनंद बाळासाहेब मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी भेट दिली वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.
चौकट
याबाबत डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भरत देवकर यांच्या संपर्क साधला असता जामखेड न्युजशी बोलताना ते म्हणाले की, वरील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सर्व डॉक्टर अशा विकृत घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.
जामखेड पोलीस लवकरात लवकर अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना पकडून योग्य शासन करतील अशी अपेक्षा आहे. सर्वच डॉक्टरांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केलेली आहे. काही समाजविघातक लोकांमुळे त्रास होतो. अशा लोकांना कोणीही पाठिशी घालू नये.





