जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते गेल्या तीस वर्षापासून साधुसंतांची सेवा करत आहेत गेली पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे जैन कॉन्फरन्सच्या आणि कोठारी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन आणी संयुक्त विद्यमानाने विविध सामाजिक कार्यक्रम करत असतात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री ऑल इंडिया स्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदमल छल्लाणी आणि श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानक वासी जैन कॉन्फरन्स (दिल्ली )विहार धाम योजना राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार भटेवरा (जैन) आणि विहार धाम योजनेचे राष्ट्रीय मंत्री मनसुखलाल गुगळे यांनी संपूर्ण विचार विनिमय करून संजय कोठारी यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे असे विहार धाम योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार भटेवरा म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आमच्या जैन कॉन्फरन्सच्या माध्यमातून रोज काही ना काही उपक्रम घेत असतात मी स्वतः त्यांच्या दोन-तीन कार्यक्रमास हजर होतो मागील वर्षी संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाच्या प्रसंगी जामखेड चे आमदार रोहितदादा पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार या हजर होत्या यावेळी त्यांनी संजय कोठारी यांच्या कार्याची खूप प्रसंशा केली या वेळी बरेच अपघातग्रस्त या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते त्यांनी सुद्धा आमचे प्राण संजयकाका कोठारी यांनी वाचवले आहे ते आमचे देवदूत आहेत असे उदगार अनेक लोकांनी काढले
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे म्हणाले माझं काम म्हणजेच माझं पद आहे मला कसल्याही पदाची अपेक्षा नाही तुम्ही फक्त मला काम सांगा मी १००% समाजाचे काम करण्याचा प्रयत्न करील विहार धाम म्हणजे बऱ्याच ठिकाणी साधुसंतांची राहण्याची व्यवस्था नसते म्हणून जैन कॉन्फरन्स आणि दान दात्यांच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी बांधण्यात येत असून जर कोठे साधुसंतांची राहण्याची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास विहार धाम बांधण्याची योजना आहे ही जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांच्यावर टाकली आहे