जामखेड प्रशासन अलर्ट – नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

0
201
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – 
कोविड १९ व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन, नगर परिषद व महसूल विभाग यांच्या वतीने संयुक्तरित्या दंडात्मक कारवाईस सुरूवात करण्यात आली असून ही कारवाई व्यापकरित्या व कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
  देशासह महाराष्ट्र राज्यात वाढत जाणार कोविड १९ व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गंभीर पावले उचलत असून त्या आज जामखेड शहरात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कारवाई मोहिम सुरू केली आहे.
ही कारवाई खर्डा चौकातून सुरू झाली असून संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे. यावेळी पोलीस  व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाई करत असल्याचे दिसत आहे.  दरम्यान विना मास्क वाहन धारक व व्यावसायीक यांचेकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे.
त्यामुळे आज दि. ३० पासून नागरिकांनी रस्त्यावर येताना बिना मास्क येऊ नये अन्यथा आपल्याला मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here