भाजप नेत्याची मुलगी काॅग्रेसची जिल्हा परिषद सदस्य 28 डिसेंबरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाशी विवाहबंधनात अडकणार

0
263
जामखेड न्युज – – – – 
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची फॅमिली मुंबईत दाखल. अंकिता पाटील यांचा विवाह निहार ठाकरे यांच्याशी होणार, 28 डिसेंबरला पार पडणार विवाह सोहळा. अवघ्या 140 लोकांच्यात विवाह पार पडणार. निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे हे पेशाने वकील. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या सदस्य आहेत.
उद्या २८ डिसेंबरला अंकिता पाटील यांचा विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहेत.  १७ डिसेंबरला हर्षवर्धन पाटील यांच्या मूळ गावी बावडा येथे गावकऱ्यांसाठी भोजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडेल. विशेष म्हणजे अंकिता पाटील या प्रतिष्ठीत ठाकरे घराण्याच्या सून होणार आहे. त्यामुळे अंकिता पाटील हिच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरु आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंधुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या निहार ठाकरेसोबत अंकिता पाटील विवाह बंधनात अडकणार आहे. निहारचं एलएलएमपर्यंत शिक्षण पूर्ण झालं असून तो पेशाने वकील आहे. तर अंकिता पाटील पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. अंकिता यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं असून १ वर्ष त्या हार्वर्डमध्ये शिकण्यास होत्या. याचवेळी निहार हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत होता. तेथेच दोघांची ओळख झाली.
निहार आणि अंकिता चांगले मित्र आहेत. अंकिता पाटील यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असून बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपात असले तरी त्यांच्या कन्या अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. अंकिता पाटील यांचे शिक्षण परदेशात झाले आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी शैक्षणिक कार्य त्यांनी सुरू केले होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या त्या सदस्या आहेत. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बावडा-लाखेवाडी गटातील निवडणुकीत त्या विजयी झाल्या आहेत.
कोण आहे निहार ठाकरे?
निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि बिंधुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे हे निहार ठाकरे यांचे सख्खे काका तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलतकाका आहेत. निहार अंकिताच्या लग्नानिमित्त ठाकरे-पाटील अशी राजकीय घराणी एकत्र येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here