जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – –
कन्या विद्यालयाची १०वी तील क्रांती धुमाळ केंद्रीय चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आली असून ३ डिसेंबरला होणा-या राज्यस्तरीय निवड चाचणीत यशस्वी झाल्यास राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
क्रांती ही रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय जामखेड मधील इ.१० वीची विद्यार्थीनी. भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय ,नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन कलाउत्सव अंतर्गत ‘द्विमिती चित्रकला स्पर्धेत’ रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय जामखेड येथील इ. १० वीत शिक्षण घेत असलेल्या कु. क्रांती बबन धुमाळ या विद्यार्थीनीने अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न होणाऱ्या औरंगाबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सादरीकरण करण्यासाठी तिची निवड झाली असून यामध्ये यशस्वी झाल्यास राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची तिला संधी मिळेल. क्रांती ही जामखेड तालुक्यातील धोंडपारगावमधील धुमाळ परिवारातील शेतकरी कुटुंबातील मुलगी असून चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून तिने जामखेडचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कन्या विद्यालयाचे कलाध्यापक संतोष सरसमकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
क्रांतीच्या या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.श्री मधुकर (आबा) राळेभात, हरिभाऊ बेलेकर, सुरेशभाऊ भोसले, प्रकाशभाऊ सदाफुले तसेच मुख्याध्यापिका सौ.कुसूम चौधरी व सर्व शिक्षक बांधवांनी तिचे अभिनंदन केले आहे.