जामखेड न्युज – – – –
31 डिसेंबर, 2021 रोजी संपणा-या सहामाहीसाठी विभागीय पोस्टल पेन्शन अदालत सोमवार 6 डिसेंबर, 2021 रोजी 12.00 वाजता वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, प्रधान डाकघर इमारत, दुसरा मजला, अहमदनगर-414001 या ठिकाणी आयोजित केली आहे. पेन्शन अदालतमध्ये सहभागी होणा-या पेन्शनर तक्रारदारास स्वखर्चाने यावे लागेल.
या अदालतीमध्ये फक्त पोस्टाच्या पेन्शन विषयक तक्रारींचा विचार केला जाईल. या तक्रारीबाबतचा लेखी अर्ज संबंधित कागदपत्रांसहित या कार्यालयात 2 डिसेंबर, 2021 पर्यंत किंवा तत्पूर्वी मिळतील अशा पध्दतीने दोन प्रतींसह पाठवावेत. या तारखेनंतर आलेल्या तक्रारींचा पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही. कृपया सर्वांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन वरिष्ठ अधिक्षक डाकघर अहमगनगर विभाग यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.