साकत जामखेड रस्त्यावरील दिशादर्शक फलक गायब

0
235

जामखेड प्रतिनिधी

              जामखेड न्युज – – –
  करमाळा साकत मार्गे पाटोदा राज्य मार्ग क्रमांक ५६ वरील साकत जामखेड रस्त्यावरील दिशादर्शक फलक चारच महिन्यात गायब झाले आहेत. यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक वेळी फलक बसवल्यावर चार ते पाच महिन्यातच ते गायब होतात याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
     अशा पद्धतीने फलक वाकवतात व दोन चार दिवसात गायब करतात
       नुकताच कोट्यावधी रुपये खर्च करून सावरगाव वस्ती ते साकत पर्यंत सात किलोमीटर रस्ता चारच महिन्यांपूर्वी तयार झाला या रस्त्यावर अनेक ठिकाणी घाट व वळण असलेल्या ठिकाणी जवळपास पंचवीस दिशादर्शक फलक बसवले होते. चारच महिन्यात यातील वीस फलक गायब झाले आहेत. नवीन रस्ता झाला की त्या रस्त्यावर दिशादर्शक फलक बसवतात व तिन चार महिन्यांतच ते गायब होतात नेमके या फलकाची चोरी होते की बसवणारेच लोक ते काढून नेतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
    दोन दिवसात हा फलक गायब होणार 
 
        नविन रस्ता झाला की दिशादर्शक फलक बसवतात आणी चार सहा महिन्यात ते गायब होतात मागेही चार सहा महिन्यातच हे दिशादर्शक फलक गायब झाले होते. आताही गायब झाले आहेत.
      दिशादर्शक फलकांमुळे कोठे वळण हे रेडियम मुळे रात्री लक्षात येते. यामुळे वाहने व्यवस्थित चालवता येतात. अपघात होत नाहीत पण आता हेच दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. नेमके प्रत्येक वेळी हे फलक गायब कसे होतात याची बांधकाम विभागाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here