जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
26 नोव्हेंबर 2021 शुक्रवार रोजी ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चर्चासत्र डॉक्टर अब्दुल कलाम सभागृहामध्ये 12 ते 3 या वेळेमध्ये संपन्न झाले. कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सुदिन संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे, याबद्दल जामखेड तालुक्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना माहिती व्हावी यासाठी दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, जामखेड यांनी कार्यक्रमचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री नागनाथ शिंदे गटशिक्षणाधिकारी होते.तर प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर अ.ल.देशमुख शिक्षण तज्ज्ञ पुणे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, सचिव शशिकांत देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार राजेशजी मोरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT

या प्रसंगी प्रथम संविधानाचे व सरस्वतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
सुरुवातीला माननीय श्री नागनाथ शिंदे गटशिक्षणाधिकारी जामखेड यांचा सत्कार श्री उद्धव देशमुख अध्यक्ष दि.पि.ई.सो. जामखेड यांच्या हस्ते करण्यात आला. व माननीय श्री शिक्षण तज्ञ अ.ल. देशमुख यांचा सत्कार माननीय श्री राजेश मोरे खजिनदार दि.पि.ई.सो. जामखेड यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले.
माननीय श्री गोकुळ गायकवाड साहेब यांनी श्री उद्धव देशमुख व श्री नागनाथ शिंदे साहेब यांना संविधान ग्रंथ प्रत सप्रेम भेट दिली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये माननीय श्री डॉक्टरअ.ल.देशमुख यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये काय बदल आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावताना पी पी टी चा उपयोग केला. त्याबद्दल सर्वांनीच मा.श्री डॉक्टर अ.ल.देशमुख यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये मा.श्री.नागनाथ शिंदे गटशिक्षणाधिकारी जामखेड यांनी माननीय श्री डॉक्टर अ.ल.देशमुख शिक्षण तज्ञ पुणे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल सविस्तर माहिती दिली. याबद्दल संपूर्ण जामखेड तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री दशरथ कोपनर सर,उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे,पर्यवेक्षक रमेश अडसूळ,सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल देडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी केले.