जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन संविधान निर्मितीतील त्यांच्या कार्याचा परिचय सर्व विद्यार्थ्यांना करुन देण्यात आला.
माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमाअंतर्गत 23 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत तेलंगशी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आल्या.संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती करणे,भारतीय संविधानातील मूलतत्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करुन संविधानाचा योग्य सन्मान करण्यासाठी 23 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत माझे संविधान माझे अभिमान हा उपक्रम तेलंगशी शाळेत राबविण्यात आला. तेलंगशी शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक जामखेड तालुक्याचे गटविकासअधिकारी श्री.प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी श्री.नागनाथ शिंदे,विस्तारअधिकारी श्री.कांतीलाल ढवळे व तेलंगशी केंद्रप्रमुख श्री.शहाजी जगताप यांनी केले आहे.
सदर उपक्रम राबविण्यासाठी तेलंगशी शाळेचे मुख्याध्यापक श्री.आनंता गायकवाड ,श्री.संतोष गोरे,श्री.सुशेन चेंटमपल्ले ,श्री.विजयकुमार रेणुके व श्रीम.लक्ष्मी जायभाय यांनी विशेष परिश्रम घेतले.