जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
आज दि-26नोव्हेबर 2021 रोजी ग्रामीण विकास केंद्र, कोरो इंडिया मुंबई समता फेलोशिप यांच्या सौजन्याने, निवारा बालगृह, मोहा फाटा या ठिकाणी ‘संविधान दिनानिमित्त, संविधान प्रबोधन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी संविधान प्रत घेऊन मिरवणूक काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेला हार घालून कार्यक्रमाचे उदघाटन जामखेड तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
ADVERTISEMENT

यावेळी जामखेड तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आपल्या मनोगतात हा दिवस भारतिय नागरिकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा असा दिवस आहे. 26 नोव्हेंबर1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले. भारत सरकारने 2015 साली राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती दिनी संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जात आहे. नागरिकांनी हक्क, अधिकाराबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवणे हे सुद्धा महत्वाच आहे. अस ते म्हणाले.
यावेळी तहसीलदार योगेशजी चंद्रे यांनी धावती भेट देऊन , संविधानाबद्दल जागृती होणे गरजेचे आहे असं ते अस मत त्यांनी व्यक्त केले. जगभरातील सर्वोत्तम अशी घटना असलेलं आपलं संविधान मानवी, हक्क, अधिकार , यांच रक्षण करणार एक प्रभावी माध्यम आहे अस ते म्हणाले.
यावेळी जामखेड पंचायत समीतिचे गटविकास अधिकारी प्रकाशजी पोळ सर यांनी आपल्या मनोगता, ज्या वेळेला कुठलीही शक्ती आपल्या बरोबर नसते त्या वेळेला संविधान आपल्या सोबत एक ताकद म्हणून आपल्या सोबत राहते, तसेच संविधान दिवस हा फक्त शासकीय कार्यक्रम न राहता या दिनाला सनाप्रमाणे साजरा करण गरजेचं आहे अस ते म्हणाले, तसेच पीडित, कष्टकरी, जनतेला संविधानाच्या मूल्यांना अनुसरून निश्चितच त्यांना त्यांचे हक्क, अधिकार मिळवून देणार असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामीण विकास केंद्र तथा निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष अँड.डॉ अरुण जाधव यांनी आपल्या मनोगतात तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत संविधानाच्या मूल्याची माहिती पोहोच करणे हे हे संविधान प्रचारकांचे काम आहे, अस ते म्हणाले.
यावेळी अँड.प्रमोद राऊत, ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ, संतोष चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संविधान प्रचारक अजिनाथ शिंदे यांनी केले. व प्रास्ताविक संविधान प्रचारक विशाल पवार यांनी केले.
यावेळी बाळगव्हानचे माजी सरपंच दादा पाटील दाताळ, सरपंच कृष्णा खाडे, तरडगावच्या सरपंच संगीताताई केसकर, लोणीचे सरपंच रघुनाथ परकड , अण्णा शिकारे, लोणीचे माजी सरपंच सिद्धू शेंडकर, मा. सरपंच बाळासाहेब खाडे, ग्रा.स. पिनू दाताळ, ग्रा.स. अशोक गंगावणे, ग्रा.पं सदस्य अश्रू गंगावणे,मच्छींद्र जाधव संविधान प्रचारक, गणपत कराळे, आतिष पारवे, शीतल काळे, तुकाराम पवार, तसेच शहानुर काळे, आयकस काळे, नितीन काळे, फुलबाई शेगर, सखुबाई शिंदे, मोहन शिंदे , साहेबराव चव्हाण, सोहेल मदारी, सलिम मदारी, सागर आहेर, प्रवीण सदाफुलें, कायदेशीर पवार,जिंदेबान काळे, डिकसेन पवार, सागर आहेर, सचिन भिंगारदिवे, वैजीनाथ केसकर, राकेश साळवे, राजू शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते