जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
आज 26 नोव्हेंबर रोजी संभाजीराजे ज्युनियर कॉलेज देवदैठण येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी उपसरपंच राहुल धेंडे यांनी पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन विद्यार्थ्याने केले.
या वेळी गावचे सेवा सोसायटी चेअरमन महादेव (तात्याबा )भोरे, खंडेराव धेंडे, ग्रा.पं.सदस्य विजय(सोनू) धेंडे, जेष्ठ नागरिक सुधीर (बप्पा) भोरे व गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच ज्यु कॉलेजचे प्राचार्य दादासाहेब मोहिते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.