जामखेड न्युज – – –
ग्रामपंचायतला मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या खर्डा शहरात एलईडी चे विद्युत दिवे लाऊन लखलखाट करण्यात येत असून याचा शुभारंभ सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या हस्ते करण्यात आला.
ADVERTISEMENT

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खर्डा शहरात लहान अनेक मोठ्या गल्ल्या आहेत. रात्रीच्या वेळी शहरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. हीच गरज ओळखून सरपंच आसाराम गोपाळघरे व पदाधिकाऱ्यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील विविध गल्ल्या, चौक, धार्मिक स्थळे, मंदिरे व किल्ला परिसरात तब्बल १६५ एलईडीचे विद्युत दिवे लावून सर्वत्र रोषणाई करण्याचा उपक्रम खर्डा ग्रामपंचायतने हाती घेतला आहे. यामुळे खर्डा शहरात येणारे पर्यटक तसेच ग्रामस्थ यांच्यासाठी हा चांगला निर्णय असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
या उद्घाटन समारंभाच्या वेळी सरपंच आसाराम गोपाळघरे यांचे बरोबरच उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, गणेश शिंदे, विकास शिंदे, सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गोलेकर, सुरज वादवणे, दिनेश लोखंडे, राजू शेख,नसीर बागवान, शमशुद्दीन बागवान, मोहन भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते प्रसंगी उपस्थित होते.